युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागातर्फे 16 व 17 रोजी खानापूर तालुकास्तरीय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावातील गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलच्या मैदानात या स्पर्धा होणार आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर आयोजित केलेल्या कबड्डी, खो खो, कुस्ती, बैलगाडी व योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंनी 16 तारखेला सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे, असे युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाचे उपसंचालकांनी कळविले आहे
Recent Comments