hubali

हुबळीत अँटी स्टॅबिंग स्क्वॉड कारवाई अंतर्गत एकाला अटक

Share

हुबळी शहरातील सार्वजनिक रस्त्यावर तलवार दाखवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या एका आरोपीला बेंडिगेरी पोलिसांनी अटक केली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता हुबळीतील गब्बूर सर्कल येथील सार्वजनिक रस्त्यावर एका व्यक्तीने गुन्हा करण्याच्या उद्देशाने तलवार दाखवून नागरिकांना घाबरवले.

याची खात्रीशीर माहिती मिळताच बेंडिगेरी पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. ख्वाजाहुसेन नदाफ असे त्याचे नाव असून, तो जुने हुबळी येथील ईश्वरनगरचा रहिवासी आहे.

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि दुचाकी जप्त केली आहे. घटनेवेळी त्याच्यासोबत असलेले अन्य दोन आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी बेंडिगेरी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायदा १९५९ च्या कलम २७(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags: