उसाच्या मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घराकडे निघालेली शेतकऱ्यांची पदयात्रा आज धारवाड जिल्ह्यात दाखल झाली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांनी शेतकरी नेत्यांची बैठक घेतली.
येरीकोप्प महामार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. आंदोलनाची रूपरेषा आणि सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि चोख सुरक्षेसाठी योग्य ते पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments