धारवाड येथील सवदत्ती रस्त्यावर असलेल्या एका स्टीलच्या दुकानाला रविवारी उशिरा रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य आणि गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम जळून खाक झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सवदत्ती रस्त्यावरील ‘लक्ष्मी स्टील ट्रेडर्स’ या दुकानात ही घटना घडली. दुकानावरील मालक रविवारी रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून गल्ल्यात पैसे ठेवून दुकान बंद करून घरी गेले होते.
त्यानंतर उशिरा रात्री दुकानामध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील विविध साहित्य आणि रोख रक्कम जळून भस्मसात झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे दुकानाच्या गल्ल्यातील काही रोख रक्कम सुरक्षित वाचवण्यात यश आले.
ही घटना धारवाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.


Recent Comments