Dharwad

धारवाड आणि हुबळी शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

Share

धारवाडमधील प्रमुख रस्त्यांवर नित्यनेमाने होत असलेली वाहनांची गर्दी आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः मैदानात उतरून पाहणी केली आहे.

धारवाडमधील बागलकोट पेट्रोल पंप आणि विद्यागिरी येथील जेएसएस कॉलेजजवळ असलेल्या सिग्नलची पाहणी करून पोलीस आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची ठिकाणे, वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमांचे पालन, सिग्नल याविषयीची सविस्तर माहिती पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

Tags: