Ramdurg

शॉर्ट सर्किटमुळे ३० एकरांतील ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

Share

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील तोरणगट्टी गावात शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शॉर्ट सर्किटमुळे सुमारे ३० एकरांतील उसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून वर्षभर घेतलेली मेहनत डोळ्यांदेखत जळून खाक झाली आहे.

एकीकडे उसाच्या दरासाठी आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे भारनियमनाच्या नावाखाली योग्य वीज पुरवठा न झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. घटना घडून अनेक तास उलटले तरी एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. आता तरी संबंधित विभाग आणि स्थानिक आमदारांनी मध्यस्थी करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत सरकारने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: