धारवाडच्या नवलूरजवळील बीआरटीएस पुलावर दोन दुचाकींची आपसात भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल उशिरा रात्री घडली आहे.
दुचाकीस्वार धारवाडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताचा आवाज होताच पुलावरून जाणारे इतर वाहनधारक आणि नवलूर येथील स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांनी दोन्ही दुचाकींवरील तिन्ही जखमींना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. परंतु रुग्णवाहिकेची वाट न पाहता उपचारासाठी उशीर होऊ नये म्हणून जखमींना तातडीने एका खासगी कारमधून रुग्णालयात दाखल केले.
धारवाड शहर वाहतूक पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली असून, प्राथमिक तपासानंतर जखमींची नावे आणि त्यांच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट होईल.


Recent Comments