Belagavi

बेळगावात श्री दुर्गामाता दौडीदरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Share

बेळगावात श्री दुर्गामाता दौडीच्या दुसऱ्या दिवशी कॅम्प परिसरात धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.

माजी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दौडीचे स्वागत करून धारकऱ्यांना फळांचे वाटप केले.

कॅम्प भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजिद शेख यांनी धारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.

या प्रसंगी कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय आणि डेप्युटी कमांडंट विनोद पाटील उपस्थित होते.

साजिद शेख, सतीश मनुरकर, डॉ. राहिला शेख, अझीझ अब्बासअली यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Tags: