Belagavi

बेळगावमध्ये भाजप महिला मोर्चाचे जोरदार आंदोलन, काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न

Share

काँग्रेस नेत्यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरात जोरदार आंदोलन केले.

शहरातील चन्नम्मा चौकातून काँग्रेस कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्यांचे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कोर्ट सर्कलजवळ पोलिसांनी आंदोलकांना रोखले, त्यामुळे पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात भाजप नेत्या सोनाली सरनोबत, उज्ज्वला बडवण्णाचे, शिल्पा केकरे, मुरगेेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Tags: