धारवाड जिल्ह्यातील अळनावर तालुक्यातील होनापूर गावाच्या शिवारात विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधून उडालेल्या ठिणगीमुळे १३ एकर उसाचे पीक क्षणार्धात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यल्लव्वा नायक यांच्या मालकीच्या शेतात हा अपघात घडला असून, शेतात असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधून उडालेली ठिणगी उसाच्या पिकावर पडल्याने काही वेळातच संपूर्ण उसाचा फड आगीच्या विळख्यात सापडला.
काही दिवसांतच हा ऊस कापणीस येणार होता, मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

आग विझवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी मोठी धडपड केली, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की उसासोबतच शेतातील सिंचनाचे पाईप आणि इतर साहित्यही जळून भस्मसात झाले आहे. याप्रकरणी अळनावर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments