कुंदरनाड परिसरातील विविध गावांच्या सद्भक्तांच्या वतीने पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी बेळगावपासून अंकलगिच्या श्री दुर्गा देवस्थानापर्यंत रविवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली.
रामतीर्थ नगर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेचा शुभारंभ बेळगावचे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी श्री दुर्गादेवीची पूजा करून केला. या वेळी बोलताना त्यांनी, पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देणारी ही पदयात्रा सर्वांसाठी मंगलदायी ठरो, अशी शुभेच्छा दिली.

अंकलगि येथील श्री अडविसिद्धेश्वर मठात पोहोचलेल्या पदयात्रींचे अक्कतंगेरहळ येथील सद्भक्तांनी जयघोषात स्वागत केले. निवृत्त शिक्षणाधिकारी रौद्रगौड जुट्टनवर यांनी कुंदरनाडची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अधोरेखित करत पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी उचललेले हे पाऊल स्तुत्य असल्याचे सांगितले.
या वेळी श्री दुर्गा देवस्थानाचे अध्यक्ष वीरनगौडा ईश्वरप्पगोल, सुरेश उरबिनहट्टी यांच्यासह अनेक मान्यवर, विविध ग्रामस्थ व दुर्गा कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रींसाठी चहा व अल्पोपहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.


Recent Comments