Belagavi

रामतीर्थ नगरमध्ये दांडियाचा उत्साह; महापौर प्रीती कामकर यांच्या हस्ते उद्घाटन

Share

बेळगाव येथील रामतीर्थ नगरमध्ये दसरा व नवरात्रोत्सवानिमित्त सुरेश यादव फाउंडेशन आणि रामतीर्थ नगर रहिवाशी संघाच्या वतीने आयोजित भव्य दांडिया नृत्य उपक्रमाचे उद्घाटन महापौर प्रीती कामकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महिला, तरुणी, युवक आणि नागरिकांनी पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून संगीताच्या तालावर दांडिया नृत्याचा आनंद लुटला. रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक रोषणाई आणि संगीतामुळे कार्यक्रमात मोठा उत्साह पाहायला मिळाला.

फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले की, असे सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासोबतच समाजात एकता आणि बंधुभाव दृढ करतात. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण असून हे उपक्रम नवीन पिढीला परंपरेची ओळख करून देतात.

या प्रसंगी उपमहापौर हनुमंत कोंगाळी, पूर्णिमा सुरेश यादव यांच्यासह रामतीर्थ नगरचे अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: