बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील गणेशपूर येथे नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले आणि नागरिकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.


गणेशपूर येथे नवरात्रीनिमित्त आयोजित विशेष पूजेत सहभागी होत त्यांनी देवीची आरती केली. या वेळी बोलताना त्यांनी, श्री दुर्गामातेने संपूर्ण राज्याला सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. नवरात्रोत्सव हा अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असून भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक मूल्ये जपण्याचा संदेश देतो, असे त्या म्हणाल्या.

यानंतर गणेशपूर येथील ज्योती नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण विकास सेवा संघातर्फे आयोजित दसरा महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. अशा सणांमुळे समाजात एकता, बंधुभाव आणि सौहार्द वाढीस लागून आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते, असे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.




Recent Comments