पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राज्य सरकारचे मुख्य प्रतोद सलीम अहमद यांनी दिली.

हुबळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ४० निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच सर्व जिल्ह्यांसाठी नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाईल.

देशात लोकशाही मूल्यांवर गदा आणली जात असल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, नीट संदर्भातील घडामोडींमुळे ही प्रक्रिया काहीशी लांबणीवर पडली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतील.
आपल्यालाही मंत्रीपद मिळण्याचा विश्वास व्यक्त करतानाच, राज्य मंत्रिमंडळात अल्पसंख्याक समाजाला चार मंत्रीपदे देण्यात यावीत अशी विनंती काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आल्याचे सलीम अहमद यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.


Recent Comments