विवाहित आयुष्याची नवी स्वप्ने पाहणाऱ्या एका १९ वर्षीय नवविवाहितेची तिच्या पतीनेच हेल्मेटने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील तारीहाळ गावात घडली आहे.

नवलगुंद तालुक्यातील इब्राहिमपूर गावची रहिवासी असलेली नागरत्ना हळेमनी (१९) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवशरण याच्यावर या हत्येचा आरोप आहे. या दोघांचा विवाह चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात झाला होता.

आज सकाळी पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. हा वाद अचानक विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या शिवशरण याने नागरत्ना हिच्यावर हेल्मेटने सपासप वार केले. या गंभीर हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नागरत्ना जागीच ठार झाली.
घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून, हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी त्याची चौकशी सुरू आहे.


Recent Comments