बंगळुरू शहरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी बेंगळुरूबाहेर नवीन शहरे विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.


बेंगळुरूबाहेर आणखी नवीन शहरे विकसित करून तिथल्या पायाभूत सोयी-सुविधा वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून लहान शहरांमध्ये बहुमजली इमारतींच्या बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डबल एफएआर’ मंजूर करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. ‘टार्गेट इंडिया’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी बंगळुरूमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो नेटवर्कचा ५०० किमीपर्यंत विस्तार, ४० किमी लांबीचा टनेल रोड आणि ‘बेंगळुरू बिझनेस कॉरिडॉर’चे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. तसेच, राज्यात तंत्रज्ञान व संशोधनाला गती देण्यासाठी आणि प्रतिभावान मनुष्यबळाला चालना देण्यासाठी बेंगळुरूमध्ये ‘एआय युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.



Recent Comments