कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत भाजप आणि जेडीएस युतीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.


राज्य सरकारच्या पाठिंब्याने या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. काही विशिष्ट संस्था, बाजारपेठा आणि काँग्रेसच्या माजी लोकप्रतिनिधींच्या घरांमध्ये ठराविक नेत्यांच्या माध्यमातून बूथ पातळीवरील काम करून घेतले जात आहे, असा आरोप प्रल्हाद जोशी यांनी केला. बूथ पातळीवरील अधिकारी योग्य माहिती न देता काम करत असून, यातील दोष दुरुस्त करूनच प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या गैरप्रकाराबाबतचे पुरावे पेनड्राईव्हद्वारे निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.

विरोधी पक्षांचे काम केवळ टीका करण्याचे आहे, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे नेते दररोज केंद्र सरकारवर टीका करत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही पुराव्यांसह बाजू मांडली असून प्रक्रियेत दोष असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. बंगळुरू येथे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार सोपवण्यात आली असून यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.


Recent Comments