Belagavi

बेळगाव ग्रामीणमध्ये मतदार यादी पुनर्रिक्षणात नियमांचे उल्लंघन

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघात मतदार यादी पुनर्रिक्षण प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय व्यक्त करत, बीएलओ काँग्रेस नेत्याच्या कार्यालयातून काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे.

गणेशपूर येथे एका काँग्रेस नेत्याच्या कार्यालयात बीएलओ नागरिकांचे अर्ज भरून घेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावरून त्यांनी जिल्हा प्रशासन आणि तहसीलदारांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मतदार यादी पुनर्रिक्षणासारखी संवेदनशील शासकीय प्रक्रिया राजकीय नेत्यांच्या कार्यालयात चालणे कितपत योग्य आहे, असा सवाल धनंजय जाधव यांनी उपस्थित केला आहे.

संबधित अधिकारी शासकीय कर्मचारी आहेत की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, असा प्रश्न विचारत हा प्रकार तातडीने न थांबल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया धनंजय जाधव यांनी दिली आहे.

Tags: