State

विविध मठाधीशांच्या उपस्थितीत डॉ. मुम्मडी निर्वाण महास्वामीजींना आदराजन्जली

Share

कनकपूर येथील देगुल मठाचे दिवंगत परमपूज्य डॉ. मुम्मडी निर्वाण महास्वामी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थिती दर्शविली.

या वेळी बोलताना त्यांनी प्रत्येकाने धर्माच्या मार्गावर चालावे आणि राजकारणातही धर्माचे अधिष्ठान ठेवून जनतेची सेवा करावी, असे आवाहन करत मठाशी असलेल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. आपण या मठाचे केवळ एक भक्त असून, आपल्या माता-पित्यांनी महादेवाकडे साकडे घातल्यामुळेच आपले नाव ‘शिवकुमार’ ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपले संपूर्ण कुटुंब देगुल मठाचे परम भक्त असून, आजही आपण धर्माचा मार्ग सोडलेला नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी झालेल्या या धार्मिक महासभेला म्हैसूरच्या सुत्तूर मठाचे श्री डॉ. शिवरात्री देशिकेन्द्र स्वामीजी आणि सिद्धगंगा मठाचे श्री सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह अनेक प्रमुख मठाधीश उपस्थित होते. याशिवाय माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, बेमूल अध्यक्ष डी. के. सुरेश आणि इतर लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून स्वामीजींना आदरांजली वाहिली.

Tags: