Belagavi

विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत सेंट मीरा हायस्कूलचे ऐतिहासिक यश

Share

बेळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अणगोळच्या सेंट मीरा इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी चारही गटांत विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशासह सेंट मीरा शाळेच्या संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.

विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत आणि सेंट मीरा शाळेतर्फे टिळकवाडी येथील लेले मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक मुलींच्या गटात सेंट मीरा संघाने भातकांडे शाळेचा २-१ असा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला, तर मुलांच्या गटातही सेंट मीरा संघाने बाजी मारली.

हायस्कूल मुलांच्या अंतिम सामन्यात खानापूरच्या शांतिनिकेतन संघाला २-० ने आणि मुलींच्या गटात भातकांडे शाळेला २-० ने पराभूत करून सेंट मीरा शाळेने सर्व चषक आपल्या नावावर केले. विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर आणि माजी राष्ट्रीय खेळाडू जीवधन पावशे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

Tags: