मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी सकाळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


कनकपुरा येथे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपली पत्नी उषा आणि बंधू डी. के. सुरेश यांच्यासह सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी जात अल्पोपहार केला आणि त्यानंतर विस्ताराविषयी प्राथमिक चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण येऊ नये, या दृष्टीने ही बैठक झाली.


दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन्ही नेते लवकरच दिल्लीला जाणार आहेत. या नियोजित दिल्ली दौऱ्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस करत राजकीय रणनीतीवर चर्चा केली.



Recent Comments