Khanapur

खानापुरात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा गौरव

Share

राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नवर यांचा आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात आला.

खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी डॉ. महेश किवडसन्नवर यांना सन्मानित केले. समाजाच्या सुदृढ स्वास्थ्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस करत असलेले काम अत्यंत मोलाचे असून, सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले.

या सोहळ्याला डॉ. सुदर्शन सुळकर, संघटनेचे सचिव डॉ. सागर नार्वेकर यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि सदस्य उपस्थित होते.

Tags: