Khanapur

“खानापूरात भूविकास बॅकेची ५८वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न”

Share

यावर्षी पावसाने योग्य साथ न दिल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.याची जाणीव ठेवून खानापूर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहिर करून केंद्र व राज्य सरकारने शेतकर्याची संपूर्ण कर्जे माफ करण्याची मागणी करणारा ठराव.खानापूर तालुका भूविकास बॅकेच्या ५८ व्यापक वार्षिक सभेत करण्यात आला.


खानापूर तालुका भूविकास बॅकेची ५८ वी वार्षिक सभा चेअरमन मुरलीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील केदारनाथ मंगलकार्यालयात सोमवारी दि.२१ रोजी पार पडली.
व्यासपिठावर व्हाईस चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर, कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के.पी.पाटील,संचालक एस बी पाटील,व्ही एम पाटील,ए बी पाटील ,एस एन गुरव,एन एन पाटील,एन के गुंजीकर,
के यू बिचूण्णावर,एस व्ही चोपडे,वाय.सी
रोथोड,एस एस करजगी,एस व्ही सडेकर,संचालिका सौ.एल एस पाटील,
सौ.एस डी आंबेवाडकर, विश्वनाथ डिचोलकर, श्री कामत ,
यशवंत बीर्जे, दरशरथ बनोशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.सुर्यगौडा पाटील व एन एन पाटील यानी वार्षिक आवाहल वाचन केले.
यावेळी चेअरमन मुरलीधर पाटील यानी भागधारक शेतकर्यानी विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तर दिले. तसेच सभासद शेतकर्यानी केलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
सभेला यशवंत गावडे,संजय कुबल,राजू कुलम ,भैरू कुंभार,विठ्ठल हिंडलगेकर,आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत कल्लापा घाडी यानी अनेक प्रश्न उपस्थित करून बॅकेचे विशेष आँडिट होणे आवश्यक आहे.असे सांगुन तसा ठराव करण्याची सुचना केली. यावेळी सभासदानी आपल्या समस्या मांडल्या.
आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

Tags: