बेळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी दुसऱ्या दिवशी संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही सुरूच असून ५० हून अधिक श्री गणेश मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत मार्गावर ताटकळत उभ्या आहेत.

शुक्रवारी दुपारी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेले नागरिक घरी जाऊन पुन्हा बेळगावच्या रस्त्यांवर दाखल झाल्याने गर्दी कायम आहे. तसेच या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘इन न्यूज’च्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

मिरवणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही गणेशोत्सव मंडळांनी डीजे आणि डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यवृंदाच्या गजरात श्री गणेश मूर्ती मार्गस्थ केल्या.

मात्र, मध्यरात्रीनंतर अनेक गणेशोत्सव मंडळांच्या श्री मूर्तींसमोर पुन्हा डॉल्बीचा प्रचंड दणदणाट पाहायला मिळाला.
प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांची अलोट गर्दी या वातावरणात विसर्जन प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे सरकत आहे.


Recent Comments