राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यापासून जनता महागाई आणि भ्रष्टाचाराने त्रस्त झाली असून, राज्य सरकार आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे, असा आरोप भाजप राज्य सरचिटणीस पी. राजीव यांनी केला.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पी. राजीव यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि अर्थसंकल्पीय तुटीवर जोरदार निशाणा साधला. सरकार उत्पन्नातील तूट भरून काढण्यात अपयशी ठरले असून कर्ज आणि व्याज भागवण्यासाठीही नव्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत दूध उत्पादकांचे ७०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तातडीने मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.

राज्यात काँग्रेस सरकार आल्यापासून महागाई आणि भ्रष्टाचार वाढला असून राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे, असे भाजप राज्य सरचिटणीस पी. राजीव यांनी म्हटले.
दूध उत्पादकांना ५० हजार रुपयांचे क्षीरक्रांती क्रेडिट कार्ड देणे आणि महिलांना शून्य टक्के व्याजाने गाय खरेदीसाठी कर्ज देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु एकाही महिला शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही, असे पी. राजीव यांनी म्हटले.
सरकारने दूध उत्पादकांचे थकीत अनुदान देण्याऐवजी दुधाचे दर वाढवून ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकल्याचा आरोप पी. राजीव यांनी केला.
राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असून शेतकऱ्यांच्या नावाने तिजोरी भरण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सरकारने स्वतःच्या तिजोरीतून ७०० कोटींचे थकीत अनुदान त्वरित वर्ग करावे, अशी मागणी पी. राजीव यांनी केली.
विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या या आर्थिक मुद्द्यांमुळे आता राज्य सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments