खानापुरात न्यायविभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे उभारलेल्या न्यायाधीशांच्या नूतन निवासस्थानाचे लोकार्पण बेळगावच्या मुख्य न्यायाधीशांच्या हस्ते पार पडले. वकील आणि न्यायाधीशांच्या सहकार्यातून नागरिकांना योग्य न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.



खानापूर येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या नूतन निवासस्थानाचे लोकार्पण बेळगाव जिल्ह्याचे मुख्य व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्या हस्ते पार पडले. यानंतर बार असोसिएशनच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील १७ न्यायालयांपैकी खानापूर येथील वकिलांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, हे येथील चांगल्या सहकार्याचे उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला न्यायाधीश चंद्रशेखर तळवार, दानप्पा, ना. आळवंडी तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. असे मुख्य व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी सांगितले.




Recent Comments