विजयनगर जिल्ह्यातील होसपेटे शहरात कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या ५० वर्षीय पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

होसपेटे शहरातील आगरस गल्लीत राहणारे राममूर्ती (वय ५५) आणि त्यांची पत्नी प्रभावती (वय ५०) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून सतत भांडणे होत होती. गुरुवारी या वादाने टोकाचे रूप घेतले. संतापलेल्या राममूर्तीने राहत्या घरातच धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून तिची क्रूरपणे हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच विजयनगरच्या पोलीस अधीक्षक (एसपी) एस. जाह्नवी, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ आणि डीएसपी मुरलीधर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. हत्या केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला होसपेटे शहर पोलिसांनी तातडीने घेराव घालून ताब्यात घेतले. या थरारक हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे.


Recent Comments