बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात असलेल्या यमकनमर्डी गावातील हुणसीकोळ मठाच्या स्वामीजींवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध यम कनमरडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुणसीकोळ मठाचे श्री सिद्धबसव स्वामीजी यांच्यावर मठाच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह इतर चार जणांवर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मेदार कुटुंबाने मठाच्या आवारात कार पार्क केली होती. रात्रीच्या वेळी कार बाहेर काढताना मठाचे गेट उघडण्यावरून मठाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. हा वाद वाढल्याने स्वामीजी तेथे आले असता त्यांच्याशीही हुज्जत घालून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


Recent Comments