हुबळीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचे भररस्त्यात अपहरण करून शेडमध्ये बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

देशपांडे नगर ते अशोक नगर दरम्यानच्या पुलाजवळ तौफिक होरकेरी हा तरुण कामावर जात असताना एका टोळीने त्याला अडवले. त्यानंतर त्याला मंटूर रस्त्यावरील मौलाली दर्गा परिसरातील एका शेडमध्ये नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जिद्दी मलिक आणि आकाश यांच्या टोळीचा हात असल्याचा आरोप जखमी तौफिकने केला आहे.

गंभीर जखमी झालेल्या तौफिकला स्थानिक नागरिकांनी तातडीने किम्स रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना अशोक नगर आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.


Recent Comments