केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीजेपीच्या आंदोलनासह विरोधकांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.

राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर सविस्तर पोस्ट करत आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.

पोस्टमध्ये त्यांनी, गेली चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी कार्यरत असल्याचे नमूद केले आहे. सक्षम, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच मजबूत राष्ट्राचा पाया असल्याचा आपल्या ठाम विश्वासाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
देशातील युवकांच्या आकांक्षा, भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आपण नेहमीच आदर केला असून, भारताच्या युवा पिढीची स्वप्ने साकार करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले. तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


Recent Comments