Belagavi

बेळगावमध्ये सीसीबी पोलिसांची मोठी कारवाई

Share

बेळगाव शहरात सीसीबी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गांजासह रंगेहात अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून हजारो रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयनगर येथील आकाश दिलीप दोडमनी याला ताब्यात घेतले आहे. २४ जुलै रोजी सहकाऱ्याच्या मदतीने गोव्यातून गांजा आणून जांबोटी रस्ता मार्गाने विक्रीचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान संशयिताकडून ८० हजार रुपये मूल्याचा १ किलो ७०४ ग्रॅम गांजा आणि ११ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

संशयित आरोपी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खून आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यात फरार होता. त्याला आता अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: