दिवाळी पाडव्यानिमित्त बेळगावजवळील बसवण कुडची येथे जय युवक मंडळाच्या वतीने ऐतिहासिक कोरीगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

बेळगाव तालुक्यातील बसवण कुडची येथे जय युवक मंडळाने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून कोरीगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. शुक्रवारी सायंकाळी मुर्गेंद्रगौडा पाटील आणि गावातील ज्येष्ठांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सोहम जोडगुंडे यांनी कोरीगड किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली.

कार्यक्रमाला तानाजी चौगुले, संजय जोडगुंडे, परशुराम जोडगुंडे, प्रकाश बेडका, संतोष चौगुला, कृष्णा बेडका, सुरेश दिवटे, अजित पाटील यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्य, मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश इटगेकर यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments