Belagavi

मराठा मंडळाच्या शाळांमध्ये बालदिन उत्साहात साजरा

Share

बेळगावमधील मराठा मंडळ हायस्कूल, जिजामाता हायस्कूल आणि मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. के. पाटील, जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एल. बी. जाधव, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील आणि तिन्ही शाळांतील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षकांनी नेहरू यांच्या जीवनातील मूल्ये आणि बालदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान तसेच नफा-तोट्याची समज निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेच्या आवारात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने तयार करून आणलेल्या डोशासारख्या पारंपरिक पदार्थांसह मोमोज, गोबी मंचुरियन आणि फ्राइड राइस या पदार्थांनी सर्वांचे लक्ष वेधले. मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता पाटील यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

याचवेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील आणि पणत्यांची स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या आकाशकंदिलांचे पाहुण्यांना सन्मानपूर्वक भेटवस्तू म्हणून वितरण करण्यात आले.

Tags: