महाराष्ट्र आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलमट्टी धरणातील पाण्याच्या आवकमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बुधवारी सकाळी ८ पर्यंतच्या नोंदीनुसार, धरणाची पाणीपातळी ५१८.२५ मीटरवर पोहोचली असून एकूण पाणीसाठा १०१.३७४ टीएमसी तर उपयुक्त साठा ८३.७५४ टीएमसी नोंदवला गेला आहे. सध्या धरणात सरासरी ६३,७९२ क्युसेक वेगाने पाणी येत आहे.

सध्या केपीसीएलद्वारे १२,५०० क्युसेक, तर इतर कारणांसाठी ३,८७३ क्युसेक असा एकूण १६,३७३ क्युसेक विसर्ग सुरू आहे. परंतु वाढती आवक पाहता आज सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रातील विसर्ग १२,५०० क्युसेकवरून टप्प्याटप्प्याने २५,००० क्युसेकपर्यंत वाढवण्यात येत आहे, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणाच्या सखल आणि खालील नदीकाठच्या परिसरातील नागरिक, शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी बाळगावी. नदीपात्रात विनाकारण जाऊ नये आणि जनावरांना नदीकाठी नेऊ नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Recent Comments