राज्यात किनारपट्टी आणि मलमनाड वगळता सर्वत्र पाऊस नसल्याने दुष्काळ गंभीर झाला असून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मात्र टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना हाती घेतल्या असून आगामी अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

राज्यात किनारपट्टी आणि मलमनाड प्रदेश वगळता इतर सर्वत्र पाऊस न पडल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे, अशी चिंता उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी व्यक्त केली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सरकारने अनेक पर्याय हाती घेतले असून, आगामी अधिवेशनातही यावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बंगळुरू येथे राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले की, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पाऊस पडल्यामुळे काही जलाशयांत पाणी आले असले, तरी राज्यातील अनेक तालुक्यांत पाऊस न पडल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडाला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
याच वेळी नाईस रस्त्याबाबत प्रतिक्रिया देताना, एच. डी. कुमारस्वामी यांचे वक्तव्य नवीन नाही आणि हा प्रश्न लवकरच सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आधीच ७ ते ८ बैठका घेण्यात आल्या असून, शेतकऱ्यांच्या समस्या व भूमी अधिग्रहण प्रक्रियेची पडताळणी करण्यासाठी तीन भाग करण्यात आले आहेत. २३ हजार एकर जमिनीपैकी किती गैरवापर झाला आहे, याची कायद्याच्या चौकटीत पडताळणी करून कारवाई केली जाईल. तसेच बिडदी प्रकल्पाबाबत विरोधकांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार असून, यावर मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments