धारवाड शहरातील कचऱ्याचा वापर करून शिवळ्ळी गावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आधीच एक आंदोलन केलेल्या शिवळ्ळी ग्रामस्थांनी आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.


या पार्श्वभूमीवर बायोगॅस प्रकल्पाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धारवाड तालुक्यातील शिवळ्ळी गावात जिल्हा प्रशासन आणि हुबळी-धारवाड महानगरपालिकेकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे. याला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, विरोध डावलून काम सुरू ठेवल्याने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.
ही माहिती मिळताच प्रकल्प परिसरात ५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवळ्ळी ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या आवारात झाडे लावून या प्रकल्पाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका आयुक्त आणि तालुका पातळीवरील अधिकारी स्वतः घटनास्थळी ठाण मांडून आहेत.


Recent Comments