gokak

सागर कोलकर यांच्यावर धार्मिक परिषदेची जबाबदारी; गोकाकमध्ये आदेशपत्राचे वितरण

Share

बेळगाव जिल्हा धार्मिक परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांना आदेशपत्रे वितरित करण्याचा कार्यक्रम गोकाक शहरातील मंत्री सतीश जारकीहोळी गृहकचेरीत पार पडला. यावेळी सागर कोलकर यांची जिल्हा धार्मिक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

नवनियुक्त सदस्यांना युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी तसेच मंदिरांच्या संवर्धनासाठी नवनियुक्त सदस्यांनी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय दत्त्ती अधिनियम, 1997 तसेच त्यातील 2011 मधील दुसऱ्या दुरुस्तीच्या तरतुदींनुसार बेळगाव जिल्हा धार्मिक परिषदेची नव्याने रचना करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही परिषद चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत कार्यरत राहणार आहे.

धार्मिक स्थळांचा विकास, मंदिरांचे संरक्षण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि धार्मिक संस्थांशी संबंधित कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार आहे.
या पार्श्वभूमीवर सागर कोलकर यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

Tags: