Gokak

पाक हल्ल्यात हात गमावलेल्या जवानाचा गोकाकमध्ये गौरव

Share

भारतीय सेनेने नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या अद्भुत लष्करी कारवाईत शौर्य गाजवलेल्या मराठा लाईट इन्फन्ट्रीचे जवान इरण्णा जनकट्टी यांचे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेनचनमरडी गावाचे इरण्णा जनकट्टी यांनी ५ आणि ६ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आपला उजवा हात गमावला. एकाच ठिकाणी सेवा बजावत असलेल्या सात जवानांपैकी ते एकटेच बचावले, ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते भारतीय सेनेच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या ९ एम.एल.आय. मध्ये सेवा बजावत होते.

१६ वर्षे देशसेवा केल्यानंतर आता ते सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळगावी परतले आहेत. याप्रसंगी, बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघाची मित्रसंस्था असलेल्या माजी सैनिक संघटना, गोकाक यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल माजी सैनिक संघटना, गोकाकचे अध्यक्ष फकिरप्पा गौडर आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचे महासंघाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Tags: