समर्थनगर येथील रेणुका मंदिर परिसरातील रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


रेल्वे रुळावरून जात असताना संबंधित व्यक्तीला रेल्वेची धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृत व्यक्तीची ओळख व अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments