माझा दिल्ली दौरा हा एक सामान्य दौरा असून यामध्ये काहीही विशेष नाही. तसेच अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाबाबत सध्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.

दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, उपमुख्यमंत्रीपदाबाबत योग्य वेळ आल्यावर चर्चा केली जाईल. तसेच सोमवारात मंत्र्यांचे खातेवाटप पूर्ण होईल, यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. यामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मंत्रीपदासाठी आग्रही असलेले आमदार एम. कृष्णाप्पा यांची नाराजी मुख्यमंत्री आणि हायलाकमांड चर्चेद्वारे दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळात महिलांना अधिक संधी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ आमदार बसवराज होरट्टी यांच्या राजीनाम्यावर बोलताना, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असून याला कोणताही राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही, लवकरच त्यांच्या जागी नवीन निवड केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील दुष्काळाबाबत बोलताना, संयुक्त पाहणी अहवाल लवकरच सादर होणार असून अहवाल हाती येताच दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार गांभीर्याने निर्णय घेईल, असे मंत्र्यांनी सांगितले.


Recent Comments