माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना हायकोर्टाकडून धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्याची परवानगी मिळताच त्यांच्या समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी धारवाड शहरभर बॅनर्स आणि पोस्टर्स लावून भव्य तयारी केली आहे.

भाजप नेते योगेश गौडा हत्या प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती देत माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्याची परवानगीही दिली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

१५ जून २०१६ रोजी धारवाडमधील सप्तपूर येथील उदय जिममध्ये झालेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने विनय कुलकर्णी यांच्यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केल्याने आणि धारवाड प्रवेशाची परवानगी दिल्याने समर्थकांनी ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स व पोस्टर लावले आहेत. विनय कुलकर्णी यांचे निकटवर्तीय प्रशांत यांच्यासह अनेक समर्थकांचे बॅनर्स धारवाडच्या मुख्य रस्त्यांवर झळकत आहेत. याशिवाय सोशल मीडियावरही स्वागताचे पोस्टर्स शेअर करून कार्यकर्ते आपल्या नेत्याबद्दलचा उत्साह व्यक्त करत आहेत.


Recent Comments