Vijayapura

आलमट्टी धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

Share

आलमट्टी धरणातून शनिवार सकाळपासून कृष्णा नदीत २५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १२ हजार क्युसेकपर्यंत वाढवला जाणार आहे. नारायणपूर धरणाची कायदेशीर गरज लक्षात घेऊन हा निर्णयवण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजता आलमट्टी धरणाची पाण्याची पातळी ५१७.४२ मीटर नोंदवली गेली असून, धरणात सध्या एकूण ८९.८०० टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ७२.१८० टीएमसी इतका आहे. धरणात सध्या सरासरी ६,०९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

सध्या धरणातून विविध कारणांसाठी ३,०१२ क्युसेक पाण्याचा वापर सुरू आहे, ज्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याचा समावेश आहे. कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुढील काही तासांत प्रवाहाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि जनावरांना नदीत सोडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Tags: