खानापूर तालुक्यात विशेष मतदार यादी पुनर्रचना मोहीम राबवली जात आहे. मात्र, या मोहिमेतील अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे.

खानापूर तालुक्यात ७० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक लोकसंख्या असल्याने हे अर्ज तत्काळ मराठीत उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा मोहीम स्थगित करावी, अशी मागणी समितीने राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खानापूर तालुका मएस अध्यक्ष गोपाळ देसाई आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाच्या २००८ च्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसारख्या भाषा अल्पसंख्याक सीमावर्ती भागात निवडणूक साहित्य आणि मतदार याद्या मराठीत देणे बंधनकारक आहे, याची आठवण समितीने करून दिली.
सन २०२४ मध्येही अशाच परिस्थितीत आंदोलनानंतर मराठीत साहित्य मिळाले होते, मात्र आता नियमांचे उल्लंघन होत असून हा मराठी भाषिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची खंत व्यक्त केली गेली.
या प्रसंगी मएस कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज खानापूर


Recent Comments