M K HUBLI

एम.के. हुबळीत बाबू जगजीवनराम भवन जागेच्या अतिक्रमणावरून निदर्शने

Share

कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी येथे डॉ. बाबू जगजीवनराम भवनाच्या जागेवर खासगी व्यक्तींकडून अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत दलित संघर्ष समितीने नगर पंचायत कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी येथील डॉ. बाबू जगजीवनराम भवनाच्या जागेचे अतिक्रमण आणि अनुसूचित जाती-जमाती समुदायासाठी राखीव असलेल्या निधीचा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विविध संघटनांनी दोन दिवस ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, संबंधित अधिकाऱ्यांना सहा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रश्न सुटला नाही तर भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

डॉ. बाबू जगजीवनराम भवनाच्या जागेवर काही खासगी व्यक्तींनी संगनमताने अतिक्रमण केले असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप राजशेखर यांनी केला. तसेच एससी/एसटी समुदायासाठीचा निधी इतर कामांसाठी वळवून अन्याय केला जात असल्याची तीव्र नाराजी राजशेखर यांनी व्यक्त केली. याचवेळी एम.के. हुबळी येथील सरकारी मुलींच्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने शेजारील तलावातील विषारी सरपटणारे प्राणी शाळेत शिरत असून विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असेही राजशेखर यांनी नमूद केले.

Tags: