M K HUBLI

एम. के. हुबळी नगर पंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघातील एम. के. हुबळी नगर पंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत बांधकामाचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला..

एम. के. हुबळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या नूतन इमारतीचे अधिकृत भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मतदारसंघात ‘एसआयआर’ प्रक्रिया यशस्वीपणे सुरू असून, नागरिक कोणत्याही भीतीशिवाय प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच आगामी काळात एम. के. हुबळी नगर पंचायत क्षेत्र आदर्श शहर म्हणून विकसित केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींच्या या विकासभिमुख भूमिकेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी एम. के. हुबळी नगर पंचायतीचे सर्व सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: