वीरभद्र नगर येथील पहिल्या क्रॉसमध्ये ५५० मीटर लांबीच्या नूतन भुयारी गटार बांधकामाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.


पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि परिसरातील स्वच्छता सुधारण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले आहे.


युवा नेते अमान सेठ आणि स्थानिक महानगरपालिका नगरसेवकांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या नागरी समस्या जाणून घेतल्या, तसेच हे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी परिसरातील नगरसेवक, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments