hubali

राहुल गांधींचे नेतृत्व बदलल्याशिवाय काँग्रेसला विजय अशक्य

Share

राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलल्याशिवाय काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळणे शक्य नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली. पराभवानंतर काँग्रेस निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर आरोप करत असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता मिटवा’ अभियानाची माहिती देताना त्यांनी मतदार यादीतील दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळण्याचे समर्थन केले. निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारी असल्यास न्यायालयात जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

राज्य सरकारने दरवाढ करून सर्वसामान्यांवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मिळालेल्या निधीचा तपशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. आताच विधानसभा निवडणूक झाल्यास भाजपला १४९ जागा मिळतील, असा दावाही अशोक यांनी केला.

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष टिप्पण्णा मज्जगी, आमदार महेश टेंगिनकायी, अरविंद बेल्लद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: