hubali

घरफोडी करणाऱ्या दोघांना हुबळी पोलिसांकडून अटक

Share

जुने हुबळी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी जुने हुबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील मरिअम्मा मंदिराजवळ एका घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी श्रीकांत सिद्धप्पा करगुप्पी आणि प्रवीण यल्लाप्पा अंगडी या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींकडून ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: