Chikkodi

जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त; एसपी के. रामराजन यांची माहिती

Share

विविध भागांतील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी गस्त वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी दिली.

चिक्कोडी येथे शेतकरी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग रोखल्यास उद्योजक, परिवहन संस्था आणि अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. बेळगाव बसस्थानकाजवळील घटना शहर आणि जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

१ नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनांनी बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि विविध संघटनांनी कन्नड राज्योत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे के. रामराजन यांनी सांगितले.

Tags: