सन २०२६-२७ च्या साखर हंगामात उसाला प्रति टन ५ हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य हसिरू सेना शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या, बुधवारी (दि. ७) कागवाड येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कागवाड नगर पंचायत सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या जाहीर सभेला हसिरू सेनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.

गेल्या ११ वर्षांपासून केंद्र सरकारने एसएमपी दर निश्चित न केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून याविरोधात केंद्रावर दबाव आणण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे.
कागवाडच्या सभेपूर्वी दुपारी उगार येथील फरीदखानवाडी गावातही शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असून, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.


Recent Comments